शासकीय अनुदान

अनुदानाचा अर्ज शेतकरी स्वतः शासनाच्या पोर्टलवर करतो. त्यासाठी लागणारं कोटेशन आणि रीतसर बिल आम्ही देतो.

आकडे आम्ही इथे मुद्दाम लिहीत नाही

किती अनुदान मिळेल, कोणत्या अवजारांना मिळेल आणि अर्जाची शेवटची तारीख — हे शासन दरवर्षी बदलतं. इथे लिहिलेला आकडा काही महिन्यांत चुकीचा ठरतो, आणि अशी चूक शेतकऱ्याचा पूर्ण हंगाम घालवते. म्हणून सध्याचे नियम पोर्टलवर किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तपासून घ्या.

अर्ज कुठे करायचा

महाराष्ट्रातल्या शेतकरी योजना शासनाच्या MahaDBT पोर्टलवरून चालतात. तुम्ही स्वतः अर्ज करू शकता, किंवा आपले सरकार सेवा केंद्रातून अथवा तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत करून घेऊ शकता.

MahaDBT शेतकरी पोर्टल ↗

साधारणपणे कोणती कागदपत्रं लागतात

  • 7/12 व 8-अ उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

नेमकी यादी योजनेनुसार बदलते. अर्ज करण्यापूर्वी पोर्टलवर तपासून घ्या.

आम्ही काय करतो

  • अर्जाला लागेल त्या पद्धतीचं लेखी कोटेशन
  • खरेदीनंतर रीतसर GST बिल
  • अवजार प्रत्यक्ष दाखवतो, म्हणजे कशासाठी अर्ज करताय ते तुम्हाला माहीत असतं